मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राजकीय भूमिकेसोबतच खासगी आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असतात. माजी मुख्यमंत्र्यांच्या मिसेस अमृता फडणवीस या त्यांच्या वेगवेगळ्या कामांमुळे ओळखल्या जातात. (BJP Devendra Fadnavis once stolen food from fridge wife revealed the secret Amruta Fadnavis shared ) नुकत्याच त्या 'झी मराठी' वरील 'किचन कल्लाकार' (Kitchen kallakar) या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी त्यांच्या अगदी किचनमधील गोष्ट शेअर केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं घर म्हटलं की सुरक्षा ही आलीच. पण फडणवीसांच्या घरी चक्क फ्रीजला देखील कुलूप असल्याचा खुलासा खुद्द मिसेस फडणवीस यांनी केला आहे. 


किचन कल्लाकार कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांची ओळख करून देण्यात आली. 



यानंतर अमृता फडणवीस यांनी आपल्या घरातील फ्रिजचा किस्सा सगळ्यांसमोर शेअर केला. 


त्या म्हणाल्या की, आमच्या फ्रीजमधून मध्यरात्री पदार्थ गायब होतात. त्यामुळे मी CID लावली. मी त्यांची संगिनी आहे. फ्रीज बदलले आणि कुलूप किल्ल्यांचे फ्रीज आणले. फ्रीजच्या चाव्या मी माझ्याकडे ठेवते, असा गंमतीदार किस्सा अमृता फडणवीसांनी सांगितला.  


अमृता यांनी सांगितले की,'पातेलंभर तुपासोबत देवेंद्र फडणवीस हे 30 ते 35 पुरणपोळ्या सहज खायचे.' 'मी न बनवलेल्या पुरणपोळ्या खाताना त्यांना पाहण्याची माझी इच्छा आहे', असंही अमृता यांनी या कार्यक्रमामध्ये सांगितलं.